.. तर नऊ कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील

By admin | Published: November 1, 2014 01:44 AM2014-11-01T01:44:55+5:302014-11-01T01:44:55+5:30

भारतातील 65 अति धनाढय़ांवर किरकोळ दराने संपत्ती कर आकारून पाच वर्षात नऊ कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले जाऊ शकते.

.. then nine crore people will come out of poverty | .. तर नऊ कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील

.. तर नऊ कोटी लोक गरिबीतून बाहेर येतील

Next
नवी दिल्ली : भारतातील 65 अति धनाढय़ांवर किरकोळ दराने संपत्ती कर आकारून पाच वर्षात नऊ कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढले जाऊ शकते. आज जारी करण्यात आलेल्या एका अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.
आर्थिक समानतेवर जोर देणारी विकास संघटना ऑक्सफॅम इंडियाचा ‘इव्हन इट अप : टाईम टू अॅण्ड एक्सटरीम इनइक्व्ॉलिटी’ या ताजा अहवालात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालात धनदांडग्यांवर 1.5 टक्के संपत्ती कर आकारून अत्यंत गरीब असलेल्या लोकांना यातून बाहेर काढण्याचे लक्ष्य प्राप्त केले जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला आहे.
अहवालानुसार, भारताने मिळकतीतील असमानता वाढ रोखल्यास 2क्19 र्पयत नऊ कोटींहून अधिक लोकांना दारिदय़ातून बाहेर काढले जाऊ शकते, असे विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
ऑक्सफॅम इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निशा अग्रवाल म्हणाल्या, सरकार हे लक्ष्य सहज प्राप्त करू शकतो. देशातील 65 अति श्रीमंतांवर अडीच टक्के संपत्ती कर आकारल्यास नऊ कोटींहून अधिक जनता सन्मानजनक आणि गरिबीमुक्त जीवन जगू शकतील. 199क् च्या दशकात भारतात केवळ दोन अब्जाधीश होते. 2क्14 मध्ये ही संख्या वाढून 65 झाली आहे. या धनदांडग्यांजवळ देशातील गरिबी दोन वेळा पूर्णत: संपविली जाऊ शकते.  सरकार आरोग्याच्या तुलनेत सैन्यावर दुपट निधी खर्च करते, असेही समोर आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: .. then nine crore people will come out of poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.