...तर मग आम्हीही सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले

By admin | Published: October 11, 2016 03:52 PM2016-10-11T15:52:22+5:302016-10-11T15:55:55+5:30

आम्ही कुणालाही डिवचणार नाही, मात्र जर आम्हाला कुणी डिवचले तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

... Then we will not leave, Rajnath Singh has banned Pakistan | ...तर मग आम्हीही सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले

...तर मग आम्हीही सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली , दि. 11 - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. आम्ही कुणालाही डिवचणार नाही, मात्र जर आम्हाला कुणी डिवचले तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. दसरा सणानिमित्त लखनऊमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक करत त्यांनी, 'भारताने बलवान राष्ट्र असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसांत भारताने आपले सामर्थ्य सिद्ध करुन देश बलवान असल्याचे जगाला दाखवून दिले आहे', असे देखील राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

आणखी बातम्या

'तेव्हा वाजपेयींनी लष्कराला LoC ओलांडण्यापासून रोखले'

लुधियानात 'नवाज शरीफ'रुपी रावणाचे होणार दहन

लखनऊमध्ये दसरा सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रामलीला कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे सोमवारी संध्याकाळीच याठिकाणी आगमन झाले आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक देखील हजर राहणार आहेत.  दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा सर्वसामान्यांसहीत राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Web Title: ... Then we will not leave, Rajnath Singh has banned Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.