मग चंदू चव्हाण गेले कुठे?
By Admin | Published: October 3, 2016 04:12 PM2016-10-03T16:12:45+5:302016-10-03T16:20:07+5:30
नकळत नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तान गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नाहीत, असे सांगत पाकिस्तानने या मुद्यावरुन यू-टर्न घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - नकळत नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तान गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण आमच्या ताब्यात नाहीत, असे सांगत पाकिस्तानने या मुद्यावरुन यू-टर्न घेतले आहे. यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तानी चॅनेल डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जवान चंदू चव्हाण ताब्यात असल्याचे पाकिस्तानी लष्कराने नाकारले आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी पाकिस्तानी लष्करातील संबंधित अधिका-यांना फोन केला. मात्र, आमच्या ताब्यात कुठलाही भारतीय सैनिक नसल्याचे पाकिस्तानने यावेळी सांगितले.
आणखी बातम्या :
भारताने 28 सप्टेंबर 2016 रोजी म्हणजेच बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण हे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याची माहिती समोर आली. भारतीय सैनिक पकडल्याची माहिती खुद्द पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली. मात्र जेव्हा चंदू यांच्या सुटकेसाठी संपर्क साधला असता, भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे सांगत पाकिस्तानने यू-टर्न घेतले.
#Pakistan Army has captured one Indian Army soldier Chandu Babulal Chohan S/O Bashan Chohan, 22 Y/O resident of Maharashtra at the LOC.
— Pakistan Defence (@defencepk) September 29, 2016