...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:31 PM2019-02-21T15:31:05+5:302019-02-21T19:02:48+5:30

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला आहे.

... then Will stop water from indian rivers; Gadkari warns Pakistan | ...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा

...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धखोरीची धमकी दिलेली असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तोंडचे पाणी पळविण्याचा थेट इशाराच देऊन टाकला आहे. पुलवामा आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर गडकरी यांनी केलेले महत्वाचे मानले जात आहे. 


14 फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जै-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी 350 किलो स्फोटके असलेली गाडी आदळवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला कायमचाच धडा शिकविण्याची मागणीनेही जोर धरला होता. यावर इम्रान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त न करता भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान गप्प बसणार नसल्याची दर्पोक्ती केली होती. तसेच त्यांच्या खासदार मंत्र्याने पाकिस्तानातील मंदिरांत घंटा वाजवू देणार नसल्याचे म्हटले होते. 


यावरून उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला आहे. भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडू आणि पाकिस्तानला ओसाड बनविण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. या तिन्ही नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. याद्वारे जलवाहतुकही सुरु केली जाईल असे गडकरी यांनी सांगितले. 



 

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यावर इम्रान खान यांनी एक चित्रफित प्रसिद्ध केली. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे, अशा चर्चा सुरू आहेत. चालू वर्ष  हे भारतामध्ये निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. भारताने हल्ला केला, तर पाकिस्तान शांत बसेल अशा भ्रमात राहू नका, हल्ला झाला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. तसेच एकदा युद्ध सुरू झाले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल.'', असे खान म्हणाल होते.


पुलवामा हल्ला घडवून आणणारा दहशतवादी हा काश्मिरी तरुण होता. त्यावरूनही इम्राना खान यांनी भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. ''काश्मीरमधील तरुण हे मरण्यासाठी का तयार होत आहेत. आत्मघाती हल्लेखोर का बनत आहेत, याचा विचार भारताने केला पाहिजे. तसेच कुठलाही प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतो. अफगाणिसत्नमध्ये 17 वर्षांच्या लढाईनंतर चर्चेस सुरुवात झाली आहे, याचे उदाहरण देत इम्रान खान यांनी चर्चेचेही आवाहन केले. 


 

Web Title: ... then Will stop water from indian rivers; Gadkari warns Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.