देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत ६१ टक्क्यांनी वाढ
By admin | Published: August 16, 2015 09:40 AM2015-08-16T09:40:08+5:302015-08-16T09:40:08+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले असून २०१५ मध्ये देशभरात दररोज संघाच्या ५१, ३३५ शाखा भरतात असा दावा केला जात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - कट्टर हिंदूत्वववादी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख असली तरी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत संघाच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०१५ मध्ये देशभरात दररोज संघाच्या ५१, ३३५ शाखा भरतात असा दावा केला जात आहे.
२०१०-११ ते २०१४-१५ या कालावधीत संघाच्या दैनंदिन शाखेत २९ टक्के, साप्ताहिक शाखेत ६१ तर मासिक शाखांमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरांमध्येही संघाच्या शाखांमध्ये वाढ झाली. २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षाच्या कालावधीत संघाच्या शाखांमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून भाजपा सत्तेवर आल्याने यामध्ये वाढ झाल्याचा अंदाज आहे. एकीकडे देशाच्या कानाकोप-यात संघाचा प्रसार होत असतानाच सोशल मिडीयावरही संघ सक्रीय झाला आहे. सध्या संघाच्या फेसबुक पेज लाईक करणा-यांची संख्या १५ लाख तर ट्विटरवर संघाला फोलो करणा-यांची संख्या दिड लाखांच्या घरात आहे.