भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांत दीड लाख लोकांचा होतो मृत्यू

By Admin | Published: March 10, 2017 12:45 AM2017-03-10T00:45:20+5:302017-03-10T00:45:20+5:30

देशात दरवर्षी ५ लाख अपघात होऊन त्यात दीड लाख लोक प्राण गमावतात, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.

There are 1.5 million road accidents in India every year | भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांत दीड लाख लोकांचा होतो मृत्यू

भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांत दीड लाख लोकांचा होतो मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात दरवर्षी ५ लाख अपघात होऊन त्यात दीड लाख लोक प्राण गमावतात, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिली.
देशात दरवर्षी होणाऱ्या सुमारे ५ लाख अपघातांत दीड लाख लोकांचा बळी जातो ही शोचनीय बाब असून, अपघाताच्या प्रचंड प्रमाणाला कुठे ना कुठे रस्ते अभियांत्रिकीही जबाबदार आहे, असे गडकरींनी शून्य प्रहरात सांगितले.
गडकरी म्हणाले की, रस्त्यावरील मृत्यू आणि अपघातांची संख्या कमी करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी खेडी आणि शहरांतून जाणाऱ्या महामार्गांवर अधिक उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत.

14268 कि.मी.चे रस्ते चौपदरी करण्यात येत आहेत. हे काम मे २०१९पर्यंत पूर्ण होणार असून, त्यावर १ लाख ८३ हजार १८० कोटी रुपये खर्च होतील.
62.42 हजार कोटी २०१६-१७ मध्ये विविध राज्यांतील राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण आाणि त्यांच्या विकासावर खर्च झाले आहेत.
43721 कोटी रुपयांचा पथकर देशात गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय महामार्गावर वसूल करण्यात आला आहे, असेही गडकरींनी सांगितले.

Web Title: There are 1.5 million road accidents in India every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.