बिहारमध्ये १७५ पोलीस बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 06:05 AM2018-11-06T06:05:12+5:302018-11-06T06:05:27+5:30

बिहारच्या राजधानीमध्ये महिला शिपायाचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्याचे कार्यालय फोडणा-या आणि रस्त्यांवर उतरून दगडफेक तसेच पोलिसांचे वाहन उलथवून देणा-या १७५ पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

There are 175 cops in Bihar | बिहारमध्ये १७५ पोलीस बडतर्फ

बिहारमध्ये १७५ पोलीस बडतर्फ

Next

- एस. पी. सिन्हा
पाटणा - बिहारच्या राजधानीमध्ये महिला शिपायाचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्याचे कार्यालय फोडणा-या आणि रस्त्यांवर उतरून दगडफेक तसेच पोलिसांचे वाहन उलथवून देणा-या १७५ पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे.
ज्या १७५ जणांना ताबडतोब बडतर्फ करण्यात आले आहे, त्यात १६७ महिला पोलीस प्रशिक्षणार्थी आहेत. उर्वरित ८ मध्येही काही महिला पोलीस आहेत. याशिवाय २३ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून, त्यातही महिला पोलिसांचा समावेश आहे. बेशिस्त आणि गुन्हेगारी पद्धतीचे कृत्य असे आरोप ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एन. एच. खान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

Web Title: There are 175 cops in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.