मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नवे चेहरे, महाराष्ट्रातून भामरे आणि आठवलेंची वर्णी

By admin | Published: July 5, 2016 11:15 AM2016-07-05T11:15:51+5:302016-07-05T12:06:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार झाला असून मंत्रिमंडळात 19 नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे

There are 19 new faces in the Modi Cabinet, Bhamre and eight schools of Maharashtra | मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नवे चेहरे, महाराष्ट्रातून भामरे आणि आठवलेंची वर्णी

मोदींच्या मंत्रिमंडळात 19 नवे चेहरे, महाराष्ट्रातून भामरे आणि आठवलेंची वर्णी

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार झाला असून मंत्रिमंडळात 19 नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात दहा राज्यातून 19 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रपती भवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पार पडला. मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.  
 
महाराष्ट्रातून धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले शपथ घेताना नाव विसरल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात प्रकाश जावडेकर यांना प्रमोशन मिळालं आहे. जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. 
 
 
आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने दलितांची सहानुभूती मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे जळगावातील वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.
 
 
शपथ घेतलेले मंत्री - 
1) प्रकाश जावडेकर
2) एस एस अहलुवालिया (पश्चिम बंगाल - दार्जिलिंगचे खासदार)
3) फग्गन सिंग कुलस्ते (मध्यप्रदेशचे खासदार)
4) रमेश चंडाप्पा (विजापूर, कर्नाटकचे खासदार)
5) विजय गोयल (दिल्ली – राज्यसभा) 
6) रामदास आठवले (आरपीआय खासदार)
7) राजेन गोहेन (आसामचे लोकसभा खासदार)
8) अनिल दवे (मध्यप्रदेशचे राज्यसभा खासदार)
9) पुरुषोत्तम रुपाला  (राज्यसभा, गुजरात)
10) एम जे अकबर (मध्यप्रदेश)
11) अर्जून राम मेघवाल (राजस्थान)
12) जसवंत सिंह भाभोर (गुजरात लोकसभा)
13) डॉ. महेंद्रनाथ पांडे (उत्तरप्रदेश, लोकसभा)
14) अजय टाम्टा (उत्तराखंड, लोकसभा)
15) कृष्णा राज (उत्तर प्रदेश)
16) मन्सूख एल मंडाविया (राज्यसभा, गुजरात) 
17) अनुप्रिया सिंह पटेल - अपना दल (मिर्झापूर, उत्तरप्रदेश)
18) सी आर चौधरी (लोकसभा- नागोर, राजस्थान)
19) पी पी चौधरी (लोकसभा- पाली, राजस्थान)
20) डॉ. सुभाष भामरे (धुळे – भाजप खासदार) 
 
 

Web Title: There are 19 new faces in the Modi Cabinet, Bhamre and eight schools of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.