हरयाणात वयाची शंभरी पार केलेले 6 हजार मतदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:28 PM2019-03-07T12:28:23+5:302019-03-07T12:30:53+5:30

राज्य निवडणूक आयोगाने हरयाणा राज्यातील मतदार यादी तयार केली असून या यादीत जवळपास 5 हजार 910 मतदार असे आहेत ज्यांनी आपल्या वयाची शंभरी ओलांडली आहे

There are 6 thousand voters who crossed age of 100 in Hariyana state | हरयाणात वयाची शंभरी पार केलेले 6 हजार मतदार 

हरयाणात वयाची शंभरी पार केलेले 6 हजार मतदार 

Next

चंदीगढ - लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होणाऱ्या हरयाणा राज्यात निवडणूक आयोगाची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. निवडणुका काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना स्थानिक प्रशासन, निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने हरयाणा राज्यातील मतदार यादी तयार केली असून या यादीत जवळपास 5 हजार 910 मतदार असे आहेत ज्यांनी आपल्या वयाची शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे या मतदारांनी आतापर्यंत केंद्रात तसेच राज्यात सत्तेत असणाऱ्या विविध पक्षांचा अनुभव घेतला असणार हे नक्की  

भारत देश हा लोकशाही प्रधान देश असल्याने हे मतदार शंभरी पार केले असले तरी देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. याचसोबत राज्यातील 90 हजार पेक्षा अधिक मतदार हे 90 ते 99 वयोगटातील आहेत. 

शंभरी ओलंडणारे मतदार असलेल्या यादीत सर्वाधित मतदार हे करनाल या जिल्ह्यात आहेत करनाल जिल्ह्यात सहा हजार मतदारांपैकी 533 मतदार आहेत. तर पंचकुला जिल्ह्यात 111 मतदार वयाची शंभरी पार केलेले आहेत. मतदार यादीत जवळपास 89 हजार 711 मतदार हे 90 ते 99 या वयोगटातील आहेत. यामध्ये सर्वाधित मतदार हे भिवानी जिल्ह्यातील आहे. भिवानी जिल्ह्यात 7 हजार 956 मतदार आहेत. 

साडेतीन लाखांहून अधिक नवीन मतदार 

हरयाणातील राज्य मुख्य निवडणूक अधिकारी इंद्रजीत यांनी ही मतदार यादी - 2019 प्रकाशित केली. या मतदार यादीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारे असे 3 लाख 68 हजार नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्याचसोबत 85 हजारांहून अधिक मतदारांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत. एकापेक्षा अधिक आणि बोगस नावे असणाऱ्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. तर 60 हजार मतदारांच्या नावांमध्ये झालेल्या चूका सुधाऱण्यात आल्या आहेत.    

 

Web Title: There are 6 thousand voters who crossed age of 100 in Hariyana state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.