भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 01:57 PM2019-01-10T13:57:19+5:302019-01-10T14:02:11+5:30

भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. 

There are around 300 terrorists waiting across the LoC to infiltrate into India -Bipin Rawat | भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत 

भारतात घुसखोरीसाठी सीमेपार 300 दहशतवादी दबा धरून आहेत - बिपिन रावत 

Next

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडे जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. 

राजधानी दिल्लीत गुरुवारी आयोजित वार्षिक पत्रकार परिषद लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणखी सुधारण्याची गरज आहे. त्याठिकाणी शांतीसाठी फक्त आम्हीच माध्यम आहोत. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा आणि दहशतवाद एकत्र येऊ शकत नाही. भारतात प्रवेश करण्यासाठी नियंत्रण रेषेबाहेर जवळपास 300 दहशतवादी दबा धरुन बसले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.


याचबरोबर, तालिबान दहशवादी संघटनाविषयी सुद्धा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी आपले मत मांडले. तालिबान प्रकरणाची तुलना जम्मू-काश्मीरसोबत होऊ शकत नाही. जर कोणता देश तालिबानसोबत चर्चा करत असेल आणि भारत अफगानिस्तानसोबत चर्चा करण्यास सकारात्मक असेल तर आम्हाला यामध्ये सामील झाले पाहिजे, असे   लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणाले. भारतीय लष्कराच्या नॉर्डर्न कमांडला येत्या 20 जानेवारीला नवीन स्नायपर रायफल्स मिळणार असल्याचीही माहिती यावेळी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली. 









 

Web Title: There are around 300 terrorists waiting across the LoC to infiltrate into India -Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.