‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात..

By Admin | Published: September 6, 2015 11:09 PM2015-09-06T23:09:19+5:302015-09-06T23:09:19+5:30

या जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात. याला सवयच आहे सतत प्रश्न विचारायची आणि त्याची उत्तरे शोधण्याची. ‘तो’ तसा खोडकरही आहे. ‘तिचा’ स्वभाव मात्र शांत आहे.

There are questions like 'him'. | ‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात..

‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात..

googlenewsNext
जुळ्या बहीण-भावांमध्ये ‘त्याला’ सारखे प्रश्नच पडलेले असतात. याला सवयच आहे सतत प्रश्न विचारायची आणि त्याची उत्तरे शोधण्याची. ‘तो’ तसा खोडकरही आहे. ‘तिचा’ स्वभाव मात्र शांत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथे राहणारे व सध्या पुण्यात इंडुरन्स टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी करणारे विजयकुमार बाबुराव केदार व जे. एस. पी. एम.मध्ये नोकरी करणार्‍या सीमा केदार यांची साईवरद व शरयू ही जुळी मुले. यांच्या घरातील हे पहिलेच जुळे आहे.
4 जानेवारी 2010 ही साईवरद व शरयू यांची जन्मतारीख. ब्लॉसम पब्लिक स्कूल या शाळेत दोघेही सिनिअर केजीमध्ये आहेत. दोघांच्या स्वभावात फरक आहे. घरामध्ये काहीही आणले की आधी ते साईवरदला हवे असते. टीव्हीवर त्याला जो कार्यक्रम पाहायचाय तोच सर्वांना पहावा लागतो. त्याच्या हातात मोबाईल असला की गेम खेळताना त्याला डिस्टर्ब केलेले चालत नाही. रनिंगमध्ये त्याला पुरस्कार मिळाला आहे. शरयू मात्र मुलींबरोबर खेळण्यात गर्क असते. आईबरोबर बडबड करणे व आईच्याच सहवासात राहणे तिला आवडते. बॅडमिंटन हा तिचा आवडीचा खेळ. क्ले मॉडेल मेकिंगमध्ये तिला पुरस्कारही मिळाला आहे. साक्षी ही यांची मोठी बहीण नववीमध्ये आहे.

4संजय द. शिंदे


बेसबॉलमधील जुळे
हे आहेत क्युबन-अमेरिकन बेसबॉल खेळाडू जुळे बंधू जोस व ऑझी कॅन्सेको. 2 जुलै 1964 रोजी यांचा जन्म झाला.

Web Title: There are questions like 'him'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.