गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकतायंत - नरेंद्र मोदी
By admin | Published: November 12, 2016 01:30 PM2016-11-12T13:30:25+5:302016-11-12T14:42:40+5:30
500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच या विषयावर भाष्य करत गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकत आहेत सांगत आपण योग्य निर्णय घेतल्याचं सांगितलं
Next
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 12 - 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच या विषयावर भाष्य करत गंगेत चार आणेही न टाकणारे आता हजारो टाकत आहेत सांगत आपण योग्य निर्णय घेतल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौ-यावर असून यावेळी त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी नोटबंदीवर भाष्य केलं आहे.
'भ्रष्टाचा-यांना आता प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. सरकार प्रामाणिक लोकांच्या पाठिशी असून नोटबंदीचा त्रास होऊनदेखील जनता आपल्या निर्णयाच्या बाजूने असल्याचं', मोदी बोलले आहेत. 'काळ्या पैशातून कुणाचीही सुटका केली जाणार नाही. सध्याची योजना पूर्ण झाल्यानंतर 30 डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांना ठिकाणावर आणण्यासाठी दुसरी योजना येणार नाही, याची हमी नाही', असं सांगत मोदींनी अजून कडक निर्णय घेण्याचा संकेत दिला आहे.
'देशाच्या गरिबांनी श्रीमंती दाखवली, श्रीमंतांची गरिबी तर खूपदा पाहिली आहे. हे खूप मोठे स्वच्छता अभियान आहे. कुणाला त्रास देण्यासाठी हे अभियान नाही', असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे.
#WATCH: PM Narendra Modi on scrapping of Rs 500/1000 notes, says "was important to keep it a secret, couldn't share it with anyone" pic.twitter.com/qbYyegw8CV
— ANI (@ANI_news) 12 November 2016
#WATCH: PM Narendra speaks in Japan on scrapping of Rs 500/1000 notes, says "salute countrymen for supporting the decision" pic.twitter.com/vjVc2bkurW
— ANI (@ANI_news) 12 November 2016