देशात सत्ताविरोधी नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं वातावरण- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:16 AM2019-04-26T10:16:57+5:302019-04-26T10:26:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

There is atmosphere in the country on behalf of the ruling power- Modi | देशात सत्ताविरोधी नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं वातावरण- मोदी

देशात सत्ताविरोधी नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं वातावरण- मोदी

Next

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी देशात सत्ताविरोधी नव्हे, तर सत्तेच्या बाजूनं वातावरण आहे, असं म्हटलं आहे. काशीमध्ये आजही मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जातायत. जनतेच्या आमच्याकडून आशा-अपेक्षा आहेत. लोकांना पुन्हा मोदी सरकार हवं आहे. पोलिंग बूथ जिंकायचं आहे. एकाही पोलिंग बूथवर भाजपाचा झेंडा खाली येणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. मीसुद्धा बूथ कार्यकर्ता राहिलो आहे.

मलासुद्धा भिंतींवर पोस्टर चिकटवण्याचं भाग्य लाभलं. आज या मंचावरून मी देशातील सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मी माझ्यातला कार्यकर्ता संपू दिला नाही. पहिलं मतदान करणाऱ्यांना सन्मान द्या. लोकशाहीला मजबूत करण्यासाठीच मी आलो आहे. मी कोणाचाही शत्रू नाही.  मेरा बूथ...सबसे मजबूत, असा नवा नाराही मोदींनी दिला आहे.


पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदान 5 टक्के जास्त करावं. मोदी सर्वाधिक मतांनी जिंकू दे अथवा नको, हा रेकॉर्डचा मुद्दा नाही. मी पंतप्रधान असल्यानंच निवडून आल्यास त्यात काय नवल आहे. त्यात मला काहीच रुची नाही. माझा लोकशाही जिंकवण्यावर विश्वास आहे.
कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, कृपाकरून याची चर्चा करत बसू नका. प्रत्येक उमेदवार हा सामान्य आहे. तोसुद्धा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ते आमचे शत्रू नाहीत, असंही मोदी म्हणाले आहेत.

Web Title: There is atmosphere in the country on behalf of the ruling power- Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.