अपयशातही यशाची संधी असते - मोदी

By admin | Published: May 31, 2015 12:08 PM2015-05-31T12:08:44+5:302015-05-31T12:11:19+5:30

परीक्षेत अनु्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, अपयशातही यशाची एक संधी असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

There is a chance for success even in failure - Modi | अपयशातही यशाची संधी असते - मोदी

अपयशातही यशाची संधी असते - मोदी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ - परीक्षेत अनु्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, अपयशातही यशाची एक संधी असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनादेखील वैमानिक व्हायचे होते, यात ते अपयशी ठरले होते, पण आज त्यांच्या या अपयशानेही त्यांना वैज्ञानिक होण्याची संधी दिली अशी आठवणही मोदींनी करुन दिली आहे. 

रविवारी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. देशभरात उष्णतेची लाट असून यापासून नागरिकांनी स्वतःचे व मुक्या प्राण्यांचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले. सीबीएसई बोर्डात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मोदी म्हणाले, पालक, शिक्षक या सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करत तुम्ही यश मिळवले. मात्र काही विद्यार्थ्यांना अपयशही आले असेल. अशा विद्यार्थ्यांनी खचू नये व अपयशातही नवी संधी असते हे लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण दिले. 

केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कार्यरत असून गेल्या वर्षभरात सरकारने तीन महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत असे मोदींनी सांगितले. सैन्यातील जवानांसाठी वन रँक वन पेंशन या योजनेची लवकरच अंमलबजावणी करु असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले आहे. 

Web Title: There is a chance for success even in failure - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.