आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:28 PM2021-12-17T16:28:40+5:302021-12-17T16:29:14+5:30

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले.

There could have been some wrong decisions but no one can say that our intention was wrong Home Minister Amit Shah | आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

आमचे काही निर्णय चुकले असतीलही पण आमच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही: अमित शाह

Next

नवी दिल्ली-

गेल्या काही वर्षात देशात बरेच बदल झालेत या मुद्द्यावर माझ्यावर टीका करणारे देखील कदाचित सहमत होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज म्हणाले. आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी काही निर्णय चुकीचे ठरले असतीलही पण पंतप्रधान मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजवर झालेला नाही. सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे.

केंद्र सरकारनं घेतलेले काही निर्णय चुकीचे असतीलही पण आमचा हेचू अजिबात चुकीचा नव्हता. त्यावर कुणीही शंका उपस्थित करू शकत नाही, असं अमित शाह म्हणाले. "देशात गेल्या सात वर्षांमध्ये बराच बदल झालेला आहे यावर माझे विरोधकही सहमत होतील. आमच्या सरकारवर आजवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. आमचे काही निर्णय चुकीच ठरले असतीलही पण आमचा हेतू चुकीचा होता असं कुणीही सांगू शकत नाही", असं अमित शाह म्हणाले. 

अमित शाह यांनी यावेळी यूपीएवरही निशाणा साधला. देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ लागला होता. पण मोदींची सत्ता येताच लोकशाही मजबूत झाली. देशात बहुपक्षीय लोकशाही यंत्रणा जवळपास कोलमडून पडण्याच्या पायरीवर होती. पण मोदी सरकारनं देशातील नागरिकांच्या मनात विश्वास प्राप्त केला आणि लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. 

उत्तर प्रदेशात प्रचार रॅली
अमित शाह यांच्या उपस्थितीत आज लखनऊ येथे "सरकार बनाओ, अधिकार पाओ'' या बोधवाक्याखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संजय निषाद आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह देखील सहभागी होणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाय मौर्य आणि दिनेश शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत. 

Web Title: There could have been some wrong decisions but no one can say that our intention was wrong Home Minister Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.