Tourism: आध्यात्मिक पर्यटनात झाली जबरदस्त वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 04:00 AM2022-09-02T04:00:39+5:302022-09-02T04:01:53+5:30

Spiritual Tourism: यंदा आध्यात्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून देशातील प्रमुख धार्मिक स्थळावरील भाविकांची संख्या आता कोविडपूर्व काळाच्या १०० टक्क्यांपर्यंत झाली आहे. धार्मिक स्थळांवरील हॉटेलांचे बुकिंगही ५० ते ९० टक्क्यांपर्यंत फुल्ल आहे.

There has been tremendous growth in spiritual tourism | Tourism: आध्यात्मिक पर्यटनात झाली जबरदस्त वाढ

Tourism: आध्यात्मिक पर्यटनात झाली जबरदस्त वाढ

Next

नवी दिल्ली : यंदा आध्यात्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून देशातील प्रमुख धार्मिक स्थळावरील भाविकांची संख्या आता कोविडपूर्व काळाच्या १०० टक्क्यांपर्यंत झाली आहे. धार्मिक स्थळांवरील हॉटेलांचे बुकिंगही ५० ते ९० टक्क्यांपर्यंत फुल्ल आहे.
धार्मिक पर्यटन वाढल्यामुळे प्रवास-पर्यटन आणि अतिथ्य क्षेत्राला मोठा लाभ होत आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला रोज १ लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देत आहेत. ही संख्या कोरोनापूर्व काळापेक्षाही अधिक आहे. सुवर्ण मंदिराचे पर्यटन अधिकारी राजविंदर यांनी सांगितले की, सध्या देशांतर्गत पर्यटक दर्शनास येत आहेत.

Web Title: There has been tremendous growth in spiritual tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.