स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:03 AM2022-03-13T08:03:02+5:302022-03-13T08:03:07+5:30
स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते.
गांधीनगर : स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेत खूप मोठी सुधारणा करण्याची गरज असताना सुधारणा करण्यात आल्या नाहीत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यानंतर अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. परंतु, यात देश पिछाडीवर पडला आहे. सुरक्षा यंत्रणा व विशेष करून पोलीस दलापासून दूर राहण्यात भले आहे, या सर्वसामान्य लोकांच्या धारणेत बदल करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. सुरक्षा यंत्रणेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला.
मोदी म्हणाले की, ब्रिटिश काळात अंतर्गत सुरक्षेचा उद्देश जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा होता. स्वातंत्र्यानंतर यात बदल करायला पाहिजे होता. आम्हाला या विद्यापीठाकडून खूप अपेक्षा आहेत. युवा पिढीकडून कसे काम करून घ्यावे व जन आंदोलनात नेत्यांशी कशा प्रकारे वर्तणूक असावी, याबाबतही प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. प्रशिक्षणाअभावी सुरक्षा दले चर्चेची क्षमता गमावतात.