मुंबईत ३०-३१ ऑगस्टला इंडियाची मिटींगच नाही, नितीश कुमारांनी सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:13 PM2023-08-25T15:13:39+5:302023-08-25T15:14:59+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात विरोधकांनी I.N.D.I.A. ची बैठकी संदर्भात अपडेट समोर आली आहे.
३०-३१ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A ची प्रस्तावीत बैठक होणार आहे. या तारखेवर आता अपडेट आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बैठकीची आता तारीखच सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात पाटणा येथे २३ जून रोजी पहिल्यांदाच देशभरातील भाजपविरोधी पक्षांची बैठक नितीश कुमार यांनी आयोजित केली होती.
एकच वार, सारे गार! नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात फायनल अन् ऑलिम्पिक तिकीट केलं पक्कं
नितीश कुमार म्हणाले की, बेंगळुरू येथील दुसऱ्या बैठकीतील पुढची बोलणी मुंबई येथे आयोजित बैठकीत होणार आहे. बहुतांश लोक ३१ ऑगस्टला मुंबईत पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बैठकीला सर्व उपस्थित राहतील. उपस्थित होत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्व लोकांची मते घेऊन दिली जातील, असंही ते म्हणाले. I.N.D.I.A. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद आणि काँग्रेसचे क्रमांक एकचे नेते राहुल गांधी यांच्या संयोजकपदी नितीश कुमार यांच्या नियुक्तीपासून ते यात काय भूमिका आहे, यासंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, १ सप्टेंबरला मुंबईत विरोधी पक्षांची बैठक आहे. आम्ही ३१ ऑगस्टला तिसऱ्या बैठकीला जाणार आहोत. आम्ही १ सप्टेंबर रोजी बैठकीला उपस्थित राहू. सर्वांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. वेगवेगळ्या राज्यांना पदभार देण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बैठकीत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली जाईल. यानंतर जो काही निर्णय होईल, तो तुम्हाला सांगण्यात येईल. यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.