केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नाही; शेतकऱ्यांचे आज पुन्हा दिल्लीकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:28 IST2024-12-08T06:28:31+5:302024-12-08T06:28:41+5:30
Farmer Protest: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना शेतकरी मोर्चात गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

केंद्र सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नाही; शेतकऱ्यांचे आज पुन्हा दिल्लीकडे कूच
नवी दिल्ली : शेती उत्पादनांना किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून शनिवारी चर्चेच्या दृष्टीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे हे शेतकरी रविवारी सकाळी पुन्हा दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू करतील. शेती उत्पादनांना देण्यात येणाऱ्या किमान हमीभावास कायदेशीर हमी मिळावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
पंजाबचे शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी शनिवारी सांगितले, ‘अद्याप केंद्र सरकारकडून चर्चेसाठी कोणताही संदेश आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आता रविवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने निघतील. आता शेतकऱ्यांनी सोबत ट्रॅक्टर किंवा इतर वाहने घेतलेली नाहीत. तरीही त्यांना का अडवले जात आहे?’
समाजमाध्यमांवर व्हिडीओ, एकावर गुन्हा
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असताना शेतकरी मोर्चात गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अतुलकुमार यादव असे या व्यक्तीचे नाव असून, शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करावे, असे आवाहन यादव यांनी केले आहे.
या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
nसरकारने जाहीर केलेल्या किमान हमीभावास कायदेशीर हमी मिळावी.
nशेतीकर्ज तत्काळ माफ करावे, शेतकऱ्यांना व शेतमजुरांना पेन्शन द्यावी.
nशेतीसाठीचे वीजदर वाढवू नयेत, शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे.