"श्रीरामाच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा नाही…”, 'इंडिया'ची सत्ता असलेल्या या राज्यातील मंत्र्याचं धक्कादायक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 04:34 PM2024-08-03T16:34:40+5:302024-08-03T16:35:42+5:30

DMK's Minister says No Evidence Of Lord Ram: भगवान श्रीरामांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आहे, असा दावा शिवशंकर यांनी केला आहे.

"There is no proof of the existence of Sri Rama...", the shocking statement of the minister of this ruling state of India  | "श्रीरामाच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा नाही…”, 'इंडिया'ची सत्ता असलेल्या या राज्यातील मंत्र्याचं धक्कादायक विधान 

"श्रीरामाच्या अस्तित्वाचा कुठलाही पुरावा नाही…”, 'इंडिया'ची सत्ता असलेल्या या राज्यातील मंत्र्याचं धक्कादायक विधान 

इंडिया आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या डीएमकेची सत्ता असलेल्या तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमकेचे नेते एस. एस. शिवशंकर यांनी श्रीरामांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. भगवान श्रीरामांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आहे, असा दावा शिवशंकर यांनी केला आहे. उलट चोल वंशाच्या राजांच्या इमारती अजूनही त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावा म्हणून काम करतात, असं विधान त्यांनी केलं. 

अरियालूर जिल्ह्यातील गंगईकोंडाचोलपूरम येछे राजेंद्र चोल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना डीएमकेचे मंत्री शिवशंकर म्हणाले की, आम्ही चोल वंशाचे सम्राट राजेंद्र चोल यांचा जन्मदिवस साजरा करतो. आमच्याकडे शिलालेख, त्यांनी बांधलेली मंदिरं आणि त्यांनी बांधलेले तलाव यासारखे काही पुरातत्विय पुरावे आहेत. मात्र भगवान रामाच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी कुठलाही पुरावा नाही आहे.

शिवशंकर पुढे म्हणाले की, भगवान राम हे ३ हजार वर्षांपूर्वी होते, असा दावा करण्यात येतो. ते अवतारी पुरुष होते, असं सांगण्यात येतं. मात्र अवतार जन्माला येऊ शकत नाही. जर राम अवतार होते, तर त्यांचा जन्म होऊ शकत नाही. तसेच जर त्यांचा जन्म झाला असेल तर ते देव असू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

शिवशंकर यांनी यावेळी रामायण आणि महाभारतावर टीका केली. ते म्हणाले की, रामायण आणि महाभारतामध्ये लोकांना शिकण्यासारखा कुठला धडा नाही आहे. मात्र तामिळ कवी तिरुवल्लूर यांनी दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोह्यांच्या संग्रहामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. दरम्यान, शिवशंकर यांनी केलेल्या विधानांवर भाजपाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपाचेतामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी डीएमकेचे नेते शिवंशकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे.  

Web Title: "There is no proof of the existence of Sri Rama...", the shocking statement of the minister of this ruling state of India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.