'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 05:22 PM2023-09-20T17:22:09+5:302023-09-20T17:22:26+5:30

'युपीएने कमकुवत विधेयक आणले होते, आम्ही मजबूत विधेयक मांडले.'

'There is no reservation on the basis of religion in the constitution', Smriti Irani's statement on minority reservation | 'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

googlenewsNext

Women's reservation bill: विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिग्गज नेते या विधेयकावर आपले मत मांडत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी  (Smriti Irani) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, अल्पसंख्यांक आरक्षणावरही भाष्य केले.

‘विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत’
काँग्रेसवर हल्लाबोल करताना भाजप नेत्या म्हणाल्या की, 'त्यांच्याकडे सत्ता होती पण त्यांनी देशाला लुटले, अन्यथा ही घोषणा फार पूर्वीच झाली असती. यूपीए सरकारने कमकुवत विधेयक आणले होते. विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. वस्तुस्थिती रेकॉर्डवर येणे महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, महिला आरक्षण विधेयकाद्वारे (देवी) लक्ष्मीने घटनात्मक रूप धारण केले आहे. मातृशक्ती हे शासनाचे केंद्र असावे अशी पंतप्रधानांची इच्छा होती. महिला सक्षमीकरण हा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे,' असं स्मृती इराणी म्हणाल्या. 

"अनेक लोक श्रेय घेण्यासाठी येतात"
सोनिया गांधी यांचे नाव न घेता स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काही लोक हे विधेयक आमचे असल्याचे सांगत आहेत. आमच्यामुळे बिल आहे, असे काही लोक म्हणत आहेत. आरक्षण ही मोदींची 15 वर्षांची गॅरंटी आहे. बरेच लोक श्रेय घेण्यासाठी येतात. पंतप्रधानांसाठी महिला सक्षमीकरण ही केवळ योजना नाही. 2014 पासून ते महिलांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी काम केले. अल्पसंख्याकांनाही आरक्षण द्यावे, अशी मागणी काही लोक करत आहेत, मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असे घटनेत म्हटले आहे,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: 'There is no reservation on the basis of religion in the constitution', Smriti Irani's statement on minority reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.