अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:14 AM2023-11-21T06:14:47+5:302023-11-21T06:15:30+5:30
वसुंधरा, शिवराज, रमण यांना केंद्रात नेणार? मुख्यमंत्रिपदी भाजपला हवे तरूण चेहरे
संजय शर्मा
नवी दिल्ली : विधानसभेच्या निवडणुका अजून संपलेल्या नाहीत, मात्र मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, याची चढाओढ सुरू झाली आहे.
वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान आणि रमण सिंह या बड्या नेत्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर करून केंद्राच्या राजकारणात आणण्याचा भाजपचा विचार आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये कडवी लढत असली, तरी या दोन्ही राज्यांत रमणसिंह आणि शिवराजसिंह चौहान हे नेते भावी मुख्यमंत्री होण्याचा दावा करत आहेत, तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजेदेखील भावी मुख्यमंत्री म्हणून दावा करत आहेत. भाजपचे श्रेष्ठी मात्र आगामी १५ ते २० वर्षे राजकारण करू शकतील, अशा नेतृत्त्वाचा विचार करत आहेत.
‘ही’ नावे आहेत चर्चेत
nराजस्थानमध्ये भाजप दोन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुनराम मेघवाल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि जयपूर राजघराण्यातील राजकुमारी दिया सिंह यांच्यापैकी कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून निवडू शकते.
nमध्य प्रदेशात केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय यांच्या जागी नव्या नेत्याच्या नावाची चर्चा आहे.
nछत्तीसगडमध्येही भाजपला रमण सिंह यांच्या जागी नव्या नेत्याकडे जबाबदारी सोपवायची आहे. त्यामध्ये अरुण साव, विजय बघेल या नेत्यांची नावे आहेत.