सुषमा स्वराज यांच्या अडचणीत आणखी भर
By admin | Published: June 22, 2015 12:10 AM2015-06-22T00:10:39+5:302015-06-22T00:10:39+5:30
मध्यप्रदेश सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि कन्येची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचे एका आरटीआय अर्जामुळे उघड झाले आहे.
भोपाळ : मध्यप्रदेश सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि कन्येची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचे एका आरटीआय अर्जामुळे उघड झाले आहे. भाजपशासित राज्यात सरकारी वकील म्हणून पती व कन्येची नियुक्ती करण्यात आल्यामुळे स्वराज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तथापि, या नियुक्तीत काही गैर नाही आणि गुणवत्तेच्या आधारावरच ही नियुक्ती करण्यात आल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसारच या नियुक्त्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्याच्या आरोपावरून स्वराज याआधीच अडचणीत आलेल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. राज्य सरकारने सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आणि अन्या बांसुरी कौशल यांची अनुक्रमे २००९ आणि २०१३ मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती, असे आरटीआय कार्यकर्ते अजय दुबे यांनी दिलेल्या अर्जाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, काँग्रेसने या मुद्यावरून चौहान यांच्यावर जोरदार टीका केली. चौहान हे केंद्रीय मंत्र्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाहीत.