३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही

By admin | Published: June 26, 2016 12:19 PM2016-06-26T12:19:53+5:302016-06-26T12:35:42+5:30

ज्यांच्याकडं अघोषित मालमत्ता आहे त्यांना सरकारनं एक संधी दिली आहे. संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. जर त्यांनी स्वत: सर्व माहीती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही

There is no action if disclosure of undeclared assets till September 30 | ३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही

३० सप्टेंबरपर्यंत अघोषित मालमत्ता जाहीर केल्यास कोणतीही कारवाई नाही

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ : ज्यांच्याकडं अघोषित मालमत्ता आहे त्यांना सरकारनं एक संधी दिली आहे. संबंधितांनी ३० सप्टेंबरपर्यंत स्वत:हून याची माहिती द्यावी. जर त्यांनी स्वत: सर्व माहीती दिल्यास सरकार कुठलीही चौकशी करणार नाही. असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयाना केले आहे. ते मन की बात या कार्यक्रमादवारे जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलातील महिला फायटरंना शुभेच्छा दिल्या. २१ तारखेला झालेल्या योगा दिनात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी देशवासींयांचे आभारही मानले. ते म्हाणेले योगाद्वारे आपण जगाशी जोडलो गेलो आहे. योगा हा आपल्या जिवनांचा अविभाज्य भाग आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे. 
 
या कार्यक्रमाच्या 21 व्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा यासाठी इच्छा व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंब न थेंब साठवून ठेवावा, असेही म्हटले आहे. 

मोदी म्हणाले की, सरकारने बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणाऱ्या नागरिकांना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यामुळे अश्या लोकांनी 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती उघड करावी. त्यानंतर मात्र कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून बचाव करू शकणार आहेत.
 
त्याचप्रमाणे आणीबाणीच्या माध्यामांतून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असे बोलत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा निशाना साधला. २५ जून २०१६ रोजी आणीबाणी ला ४० वर्ष पुर्ण झाली आहेत.  आणिबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्या हाती अर्निबध सत्ता एकवटली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी घटनेच्या ३५२(१) कलमानुसार २५ जूनच्या रात्री आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लगेचच आणीबाणी लागू झाली
 

मन की बात मधील काही महत्वाचे मुद्दे - 

 
चंदीगढ मध्ये हजारो योगप्रेमींसोबत योगा करण्याचा आनंद मिळाला, छोट्या - मोठ्यांचा उस्ताह पाहण्यासारखा होता. योगामध्ये जगाला जोडण्याची ताकद, सगळ्यांनी एकत्र यावे. 
 
सर्वच क्षेत्रात मुली वेगाने प्रगती करत आहेत, भारतीय हवाई दलात प्रथमच दाखल झालेल्या तीन महिला फायटर पायलट अवनि, मोहना, भावना यांना पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या...
 
शेतकरी जसा मेहनत करतो, त्याचप्रमाणे देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वैज्ञानिकही कष्ट घेत आहेत... 
 
'इस्रो'नं अवकाशात सोडलेल्या, तसंच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या उपग्रहांना माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे... हे सर्व विद्यार्थी अभिनंदनास पात्र आहेत...
 
इस्रोची कामगीरी उलेखनिय आहे. नव्या पिढीने वैज्ञांनिक होण्याचे स्वप्न पाहवे.
 
योगविषयक अनुभव #YogaFightsDiabetes या हॅशटॅगसह सोशल मीडियावर किंवा NarendraModiApp वर पाठवण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन...
 
देशातील शेतकरी आणि वैज्ञांनाकांची कामगीरी उल्लेखनीय
 
लोकशाही हीच देशाची खरी ताकद, लोकसहभागातून देशाची उन्नती व्हायला पाहिजे
 
सरकार आणि जनतेतील अंतर कमी व्हायला पाहिजे
 

Web Title: There is no action if disclosure of undeclared assets till September 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.