विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही - कृपाशंकर सिंह

By admin | Published: October 9, 2014 04:11 AM2014-10-09T04:11:59+5:302014-10-09T04:11:59+5:30

समाजातील सर्व घटकांचा विचार व विकास करण्याचे काम केवळ कॉँग्रेस पक्षच करतो. अन्य कोणत्याही पक्षात ती धमक नाही.

There is no alternative to Congress for development - Kripashankar Singh | विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही - कृपाशंकर सिंह

विकासासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही - कृपाशंकर सिंह

Next

मुंबई : समाजातील सर्व घटकांचा विचार व विकास करण्याचे काम केवळ कॉँग्रेस पक्षच करतो. अन्य कोणत्याही पक्षात ती धमक नाही. त्यामुळे राज्याला देशात अग्रेसर ठेवण्यासाठी सुजाण नागरिक कॉँग्रेसला पूर्ण बहुमत देतील, असा आपला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन कलिना विधानसभा मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केले.
कलिनातील चुनाभट्टी शास्त्रीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी या मतदारसंघात केलेल्या विकासकामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘सेना-भाजपासह अनेक जातीयवादी पक्ष केवळ विशिष्ट धर्म, गटाबाबत विचार करतो. मात्र केवळ काँग्रेसने नेहमी दीनदलित, अल्पसंख्याकांसह सर्व समाजाच्या विकासासाठी राजकारण केले आहे. जाहिरातीद्वारे जनतेची दिशाभूल करून केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे खरे रूप उघड झाले आहे. त्यामुळे मतदार आता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. गेली १५ वर्षे इथल्या बहुजन, अल्पसंख्याक समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले असून या निवडणुकीत ते जातीयवादी पक्षासह राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत.’
या वेळी दलित चळवळीतील प्रकाश मोरे म्हणाले, ‘बहुजन समाजातील काही तथाकथित व स्वयंघोषित नेते स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपा व अन्य पक्षाच्या वळचणीला गेले आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी जनता त्यांच्या मागे जाणार नाही. कृपाशंकर सिंह यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा विडा आम्ही उचलला आहे.’ रॅलीमध्ये महिला, तरुणींसह परिसरातील अबालवृद्धांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: There is no alternative to Congress for development - Kripashankar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.