मारहाण झालेली नाही
By admin | Published: March 11, 2016 10:26 PM2016-03-11T22:26:43+5:302016-03-11T22:26:43+5:30
(बहिणाबाई हॉकर्स स्थलांतर वाद बातमीत कोट)
Next
(ब हिणाबाई हॉकर्स स्थलांतर वाद बातमीत कोट)मारहाण झाली नाही. उद्यानाच्या पाठीमागील बाजूने स्थलांतर करावयाचे होते. तेथे घाण असल्याने गाड्या उद्यानाच्या पुढच्या बाजूलाच उभ्या करून सफाई झाल्यावर नेतो, असे अतिक्रमण अधीक्षकांना सांगितले होते. मात्र अतिक्रमण विभागाचे कर्मचारी एकदम आले व गाड्या नेण्याची घाई करू लागले. त्यातच एका कर्मचार्याने आमची गाडी लोटायला सुरूवात केल्याने लहान भावाचा त्या कर्मचार्याशी वाद झाला. मात्र मारहाण झालेली नाही. तसेच अतिक्रमण अधीक्षकांनीच पुढच्या रांगेतील हॉकर्सला पाठीमागे स्थलांतर करताना प्राधान्य असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गाड्या लावण्यात आल्या. आमच्यात काहीही वाद नव्हते. उर्वरीत जागेवर इतर हॉकर्सला जागा देण्यात आली. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून जागा देण्याचा प्रश्नच आला नाही. -सुनील सोनार, पदाधिकारी, हॉकर्स असोसिएशन.