भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:08 AM2018-06-15T06:08:02+5:302018-06-15T06:08:02+5:30

 There is no decision about the successor of Bhayyuji Maharaj | भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही

भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही

Next

इंदोर  - भय्युजी महाराज यांनी संपत्तीचे आर्थिक अधिकार सेवेकरी विनायक दुधाडे यांना दिल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या ट्रस्टच्या एका पदाधिका-याने स्पष्ट केले आहे की, आर्थिक अधिकाराबाबत सद्या कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

भय्युजी महाराज यांच्या सुसाइड नोटवरून हा मुद्दा समोर आला आहे. याबाबत बोलताना श्री सद्गुरु दत्त धार्मिक ट्रस्टचे सचिव तुषार पाटील म्हणाले की, आम्ही याबाबत काही विचार करण्याच्या मनस्थितीत सद्या नाहीत. त्यांनी संकेत दिले की, काही दिवसानंतर ट्रस्टची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेतला जाईल.

पाटील म्हणाले की, आम्ही बैठक घेऊन हे निश्चित करू की, महाराजांनी सुरू केलेल्या विविध योजना कशा प्रकारे पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी सांगितले की, भय्युजी महाराज यांनी २१ मार्च १९९९ मध्ये स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये ११ ट्रस्टी आहेत. ही संस्था मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि अन्य राज्यात कृषि, जल संरक्षण आणि सामाजिक कार्यात काम करते.

डॉ. आयुषी-कुहूमध्ये वाद
भय्युजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू यांच्यात वाद असल्याचे आता लपून राहिलेले नाही. विविध मुद्यांवर तपास करणाºया पोलिसांनी या प्रकरणात पत्नीसह ७ जणांचे जबाब घेतले आहेत. तसेच, कॉम्युटर, मोबाइल जप्त केले आहेत.

मुलीला भेटायला चालले होते?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भय्युजी महाराज हे सोमवारी मुलगी कुहू हिला भेटायला पुण्याला निघाले होते. मात्र, असे समजले की, कुहू मंगळवारी इंदोरला येत आहे. त्यामुळे ते वाटेतूनच परतले.

नेमके कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. आयुषी आणि मुलगी कुहू यांच्यात अबोला होता. त्यामुळेच महाराजांनी आपल्या दुसºया पत्नीला वेगळा फ्लॅट घेऊन दिला होता.

आईसाठीही काहीच नाही?
लोकांना याचे आश्चर्य वाटत आहे की, आर्थिक अधिकार कुटुंबातील व्यक्तीऐवजी विनायककडे कसे दिले? आपल्या वृद्ध आईच्या नावेही काहीच ठेवले नाही.

दुस-या लग्नामुळे कुटुंब नाराज
महाराजांच्या काही निकटवर्तीय लोकांनी सांगितले की, कुटुंबातील काही लोक दुसºया लग्नामुळे खुश नव्हते.

नर्मदा नदीत अस्थींचे विसर्जन
भय्युजी महाराज यांच्या अस्थी गुरुवारी महेश्वर येथे नर्मदा नदीत विसर्जित करण्यात आल्या. देशातील प्रमुख नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  There is no decision about the successor of Bhayyuji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.