सूर्य नमस्कार आणि नमाजात फरक नाही- योगी आदित्यनाथ
By admin | Published: March 29, 2017 06:37 PM2017-03-29T18:37:34+5:302017-03-29T19:16:48+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 29 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर्य नमस्कार आणि नमाजामध्ये साम्य असल्याचं म्हटलं आहे. सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांची नमाज पढण्याची प्रक्रिया मिळती जुळती आहे असं ते म्हणाले.
सूर्य नमस्काराचे आसन आणि मुस्लिम बांधवांच्या नमाज पढण्याच्या प्रक्रियेत साम्य आहे पण आतापर्यंत सत्तेत असलेल्यांनी सूर्य नमस्कार आणि नमाज यांना कधी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. सत्तेत असलेल्यांना योग नाही तर 'भोग'ची सवय होती. लखनऊमध्ये आयोजीत 3 दिवसीय योग महोत्सवात योगी बोलत होते.
यावेळी बोलताना आदित्यानाथांनी योगाचं महत्व सांगितलं. व्यायामामुळे फिटनेसचा फायदा होतो पण तो एका ठरावीक वेळेपर्यंतच. याउलट योग करणा-या व्यक्तीचं स्वास्थ्य शेवटपर्यंत उत्तम राहतं. योग करण्यासाठी कोणत्या जाती किंवा धर्माचं बंधन नसतं. काहीजण केवळ प्राणायमला योग मानतात पण योगा बसताना किंवा चालतानाही करता येतो असं ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीपर्यंत योगा पोहोचवण्याचं काम उत्तर प्रदेश सरकार करेल असं ते यावेळी म्हणाले.