जवानांवर हात उचलणा-या नराधमांची धरपकड सुरू

By admin | Published: April 14, 2017 11:25 AM2017-04-14T11:25:24+5:302017-04-14T11:42:25+5:30

श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणा-या नराधमांची ओळख पटली असून कारवाईला सुरुवात झाली आहे

There is no doubt about this | जवानांवर हात उचलणा-या नराधमांची धरपकड सुरू

जवानांवर हात उचलणा-या नराधमांची धरपकड सुरू

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 14 - श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणा-या नराधमांची ओळख पटली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. जवानांवर हात उचलून त्यांच्या देशसेवेचा अपमान करणा-या काश्मिरी तरुणांना जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीआरपीएफचे महासंचालक शुक्रवारी श्रीनगरला जाणार आहेत. दरम्यान गुरुवारी सीआरपीएफने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
 
(VIDEO: काश्मीरमध्ये जवानांना भररस्त्यात मारहाण, पाहून तुमचंही रक्त उसळेल)
(जवानांना मारलेल्या प्रत्येक थप्पडीसाठी 100 जिहादींना ठार करा - गौतम गंभीर)
 
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला होता. निवडणूक संपल्यानंतर एव्हीएम घेऊन परतणा-या जवानांना तरुणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यासंबंधीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मारहाण करणा-या तरुणांना जीवनाची अद्दल घडवा अशी मागणी अनेकजण करू लागले होते. 

 
विशेष म्हणजे अशी वागणूक मिळत असाना भारतीय जवान जे पूर्णपणे सशस्त्र होते त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चालत राहणं पसंत केलं. आपल्याकडे असलेले एव्हीएम सुरक्षितपणे पोहोचवणे हा आपला मुख्य हेतू असल्याने इतर कोणत्याही गोष्टीकडे जवानांनी लक्ष दिलं नाही. याउलट त्यांनी हे सर्व संयमाने सहन केलं. 
 
"सध्या जवानांवर पेलेट गनचा वापर केला जात असल्याने वारंवार टीका केली जात आहे. मात्र हा व्हिडीओ लोकांनीच काढला असून त्यांनीच अपलोड केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक होत असल्याचं स्पष्ट दिसत असून जवानांनी प्रतिक्रिया दिलेली नाही", असं सीआरपीएफचे प्रवक्ते भवनेश कुमार यांनी सांगितलं होतं. 
 
याप्रकरणी सामान्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असताना भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेदेखील भारतीय जवानांना मारल्या जाणा-या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. 
 

 

Web Title: There is no doubt about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.