काश्मीरमधील हिंसेबाबत राज्यसभेत चिंतेचा सूर
By admin | Published: August 9, 2016 03:06 AM2016-08-09T03:06:57+5:302016-08-09T03:06:57+5:30
सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे
नवी दिल्ली : सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दहशतवादी बुरहान वणी ८ जुलै रोजी ठार झाल्यापासून, काश्मीरमध्ये गेले महिनाभर कर्प्यू आणि तणावाची स्थिती आहे. गोळीबार व हिंसाचारात आतापर्यंत जवळपास ६0 लोक ठार झाले असून, ४ हजारांपेक्षा अधिक लोक तसेच सुरक्षा दलाचे ३३00 जवान जखमी अवस्थेत आहेत. पंतप्रधानांनी या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. ते बोलत का नाहीत? हा सवाल आहे.
या समस्येवर सरकारने लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि काश्मिरी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वक्षीय नेत्यांचे पथक तिथे पाठवावे,अशी मागणी सोमवारी राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. सीताराम येचुरी, डी.राजा, शरद यादव, नीरज शेखर आदींनी त्यांना दुजोरा दिला. सभागृहाचे कामकाज थांबवून काश्मीर
समस्येवर अग्रक्रमाने चर्चा करावी, या मागणीची नोटीस आझादांनी दिली होती.