मोदींच्या देशांतर्गत दौऱ्यावरील खर्चाची कोणतीही नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:02 AM2019-04-13T05:02:35+5:302019-04-13T05:02:47+5:30
आरटीआय अर्जाला ‘पीएमओ’चे उत्तर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत दौºयावर होणाºया खर्चाची कोणतीही नोंद आम्ही ठेवत नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या विदेश तसेच देशांतर्गत दौºयावर मे २०१४ पासून किती खर्च करण्यात आला, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली होती. त्यांच्या अर्जावर उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी प्रवीण कुमार यांनी म्हटले की, देशांतर्गत दौºयाच्या खर्चाच्या नोंदी आम्ही ठेवीत नाही. कारण हे दौरे विविध सार्वजनिक प्राधिकरणांकडून व्यवस्थापित केले जातात. पंतप्रधानांचे निवडणूक प्रचार दौरे शासकीय नसल्याने त्यांच्या खर्च नोंदी ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे यासंबंधी कोणताही तपशील दिला जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या विदेश दौºयावरील खर्चाचा तपशील मिळविण्यासाठी पीएअमो वेबसाईटवर जा, असा सल्ला गलगली यांना देण्यात आला.
म्हणणे काय?
अलीकडे मोदी यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम आणि जम्मू व काश्मीर या राज्यांचे दौरे करून प्रचारसभा घेतल्या. केंद्रीय मंत्र्यांच्या विदेश दौºयाच्या माहितीचा प्रश्न पीएमओने एमअँडजी तसेच गृह मंत्रालयाकडे पाठविला. या माहितीशी त्यांचा अधिक संबंध आहे, असे पीएमओने म्हटले.