अनेक बदलांनंतरही राजस्थानमध्ये पद्मावतचे प्रदर्शन नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:33 PM2018-01-08T20:33:48+5:302018-01-08T20:35:57+5:30
सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही जनभावना विचारात घेता पद्मावत चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.
जयपूर - सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही जनभावना विचारात घेता पद्मावत चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. त्याआधी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी पद्मावत चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले होते.
पद्मावत चित्रपटातील इतिहासाबाबत राजस्थानमधील राजपुत समुदायाने आक्षेप घेतला होता. तसेच करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, वाद वाढल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटात अनेक फेरबदल करण्यास सहमती दर्शवली होती. पद्मावत चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
काय आहेत बदल
केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत.
सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.
राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा असे सांगण्यात आले आहे.