'आप'च्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही - अरूण जेटली
By admin | Published: December 17, 2015 06:31 PM2015-12-17T18:31:51+5:302015-12-17T19:11:10+5:30
आप पक्षाच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांच केंद्रिय मंत्री अरुण जेटली यांनी खंडन केल 'आप'च्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही असे ते म्हणाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आप पक्षाच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपांच केंद्रिय मंत्री अरुण जेटली यांनी खंडन केल 'आप'च्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही असे ते म्हणाले. DDCA च्या अध्यक्ष पदावर असताना ४०,००० लोक बसण्याची क्षमता असलेल स्टेडियम ११४ कोटी रुपयात 'पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग' या कंपनीच्या माध्यमातून तयार केल आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा गैरप्रकार झालेला नाही. दिल्ली सरकार आपल्या भ्रष्ट आधिकाऱ्यास वाचवण्यासाठी माझ्या बाबत चुकाचं आणि बिनबुडाचे आरोप लावत आहेत. भाजपाकडून स्मृती इराणी यांनी आप पक्षाच्या आरोपाच खंडन करत अरुण जेटलींचा बचाव केला. तर संसदी कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आम आदमी पक्षाच्या निरर्थक आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही असे म्हटले.
जेटली यांनी नाव न घेता किर्ती आजाद यांना खडसावले, ते म्हणाले यूपीए सरकार ने २१ मार्च २०१३ साली DDCA ची छानबिन करण्यासाठी एक समिती नेमली होती त्या समीतीच्या अहवालात DDCA मधील प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत त्यात कोणताही भ्रष्ट्राचार झालेला नाही म्हटले आहे.
काय आहेत 'आप'चे आरोप -
- अरुण जेटलीच्या कार्यकाळात डीडीसीएच्या स्टेडियमच्या बांधणीसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले होते. ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. उरलेले ९० कोटी कुठे गेले ?
- डीडीसीएतून पैसा काढण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. डीडीसीएने १ कोटी ५५ लाखाचे कर्ज तीन कंपन्यांना दिले, कर्ज देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही
- ज्या कंपन्यांनी काम केले नाही त्यांनाही डीडीसीएतून पैसे देण्यात आला
- डीडीसीएचे खजिनदार नरेंद्र बत्रा यांच्याबरोबर अरुण जेटलींचे काय संबंध आहेत ?