बायबल व कुराणमध्ये भारताचा आत्मा नाही - केंद्रीय मंत्री महेश शर्मा
By admin | Published: September 14, 2015 10:06 AM2015-09-14T10:06:03+5:302015-09-14T10:06:12+5:30
कुराण व बायबलमध्ये भारताचा आत्मा नाही असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - कुराण व बायबलमध्ये भारताचा आत्मा नाही असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. रामायण, महाभारत व गीता हे देशातील प्रत्येक शाळेत बंधनकारक करायला हवे असेही त्यांनी म्हटले असून महेश शर्मा यांच्या विधानाने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
महेश शर्मा यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी भारतीय संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती यावर त्यांची रोखठोख मतं मांडली. बायबल व कुराण यांचा मी आदर करतो, पण ते फक्त धर्मग्रंथच आहे, त्यामध्ये रामायण व महाभारताप्रमाणे भारताचा आत्मा नाही असे महेश शर्मा यांनी म्हटले आहे. भारताता सांस्कृतिक मंत्री असल्याने गीता व रामायणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, यासाठी मी केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या संपर्कात आहे असे त्यांनी नमूद केले. पर्युषणप्रमाणेच नवरात्रीच्या नऊ दिवसांतील मांसविक्रीवर बंदी टाकावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाश्चिमात्त्य संस्कृतीने भारतीय संस्कृती प्रदुषित केली अशी खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.