काँग्रेसशी आघाडी नाहीच -करात
By admin | Published: January 19, 2016 02:56 AM2016-01-19T02:56:40+5:302016-01-19T02:56:40+5:30
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच्या निवडणूक आघाडीचे वृत्त माकपाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी सोमवारी फेटाळून लावले
धनबाद (झारखंड) : पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच्या निवडणूक आघाडीचे वृत्त माकपाच्या पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात यांनी सोमवारी फेटाळून लावले.
माकपा व काँग्रेस यांच्यात निवडणूक आघाडीचे वृत्त निराधार आहे. यात काहीही तथ्य नाही, असे त्या म्हणाल्या. शनिवारी माकपा नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी काँगे्रस व अन्य डाव्या पक्षांना संदेश पाठवून सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बेदखल करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते, या पार्श्वभूमीवर वृंदा करात बोलत होत्या. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत माकपाची आघाडी कधीही शक्य नाही. याबाबतचे वृत्त निराधार आहे, असे त्या म्हणाल्या.