नरेंद्र मोदी-शरीफ यांची बैठक नाहीच

By admin | Published: November 27, 2014 02:41 AM2014-11-27T02:41:09+5:302014-11-27T02:41:09+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले.

There is no meeting of Narendra Modi-Sharif | नरेंद्र मोदी-शरीफ यांची बैठक नाहीच

नरेंद्र मोदी-शरीफ यांची बैठक नाहीच

Next
काठमांडू : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
या दोन्ही पंतप्रधानांची बैठक आयोजित करण्याची आमची योजना नाही कारण पाकिस्तानकडून तशी विनंती करण्यात आलेली नाही, असे अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
सार्क परिषदेसाठी आलेल्या राष्ट्र प्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार आहेत, पण त्यात पाकिस्तानचा समावेश नाही. इतर नेत्यांच्या बैठकीत होणा:या वाटाघाटींची माहिती आम्ही देऊ, असे अकबरुद्दीन म्हणाले. मोदी यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत शरीफ यांच्या भेटीचा उल्लेख नाही. अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश व भूतान  यांच्या नेत्यांशी भारताचे पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. 
बिझनेस व्हिसा 
भारत सार्क देशांना 3-5 वर्षाचा बिझनेस व्हिसा देईल, तसेच सार्क व्यापारी प्रवासी कार्डही जारी केले जाईल, यामुळे भारतात प्रवेश करणो सोपे होईल. दक्षिण आशिया हा समृद्ध लोकशाहीचा प्रदेश असून आपला वारसाही समृद्ध आहे.  युवापिढीची शक्ती, बदल व प्रगतीची इच्छा हे आपले सामथ्र्य आहे. मी भविष्यातील भारताची स्वप्ने पाहतो व हा संपूर्ण परिसर समृद्ध व्हावा, अशी आशा करतो, असे मोदी म्हणाले. 
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सार्क नेत्यांचे आभार मानले. आपल्या परराष्ट्र दौ:याचे अनुभव सांगितले. (वृत्तसंस्था)
 
मोदी - शरीफ यांच्यात दुरावा
4काठमांडू- ते एकाच व्यासपीठावर होते, पण त्यानी हस्तांदोलनही केले नाही. सार्क परिषदेच्या पहिल्या दिवशी तीन तास कार्यक्रम चालले होते, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात दुरावाच होता. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीपासून दोन आसने पलीकडे नवाज शरीफ बसले होते. पण त्यानी एकमेकाकडे पाहिलेही नाही. मधल्या आसनावर मालदीव व नेपाळचे नेते बसले होते. 
4मोदी व शरीफ यांच्यात बैठक ठरलेली नव्हती. पण दोघानी हास्यविनोदही करु नयेत असेकाही ठरले नव्हते. आज आणि उद्या गुरुवारीही दोघांना एकाच व्यासपीठावर बसायचे आहे. तसेच रिट्रिट कार्यक्रमातही सहभाग नोंदवायचा आहे. मंगळवारी शरीफ यांनी भारत-पाक वाटाघाटी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताने द्यावे असे म्हटले होते.  भारताने पाकबरोबर वाटाघाटी होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. 
 

 

Web Title: There is no meeting of Narendra Modi-Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.