डोकलाम सीमेवर चीनकडून कोणताही नवीन वाद नाही, परराष्ट्र मंत्रालयानं केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 08:31 AM2017-10-28T08:31:55+5:302017-10-28T08:33:12+5:30

डोकलाममध्ये सध्या कोणताही नवीन विवाद निर्माण झालेला नाही, असे डोकलाममधील चिनी सैनिकांच्या सध्याच्या हालचालींसंदर्भातील मिळालेल्या अहवालावरुन परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.

There is no new dispute over China's border with the border, foreign ministry has clarified | डोकलाम सीमेवर चीनकडून कोणताही नवीन वाद नाही, परराष्ट्र मंत्रालयानं केले स्पष्ट

डोकलाम सीमेवर चीनकडून कोणताही नवीन वाद नाही, परराष्ट्र मंत्रालयानं केले स्पष्ट

Next

नवी दिल्ली : डोकलाममध्ये सध्या कोणताही नवीन विवाद निर्माण झालेला नाही, असे डोकलाममधील चिनी सैनिकांच्या सध्याच्या हालचालींसंदर्भातील मिळालेल्या अहवालावरुन परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे. डोकलाम सीमेवर चिनी सैनिक तळ ठोकून असून तेथे बांधकाम सुरू आहे, असा दावा सॅटलाइटद्वारे समोर आलेल्या काही छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे की, ''वादग्रस्त भूभागावर चीनकडून सध्या नव्यानं अशा कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. शिवाय, ज्या बांधकामाची चर्चा सुरू झाली आहे ते बांधकाम चिनी सीमेच्या आतमध्येच झाले आहे''. 

'डोकलाम सीमेवर कोणताही नवा विवाद सुरू झालेला नाही. यावरुन समोर आलेला अहवाल हा खोटा आणि चुकीचा आहे',असे परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. 28 ऑगस्टच्या करारानंतर वादग्रस्त भूभागावर नव्यानं कोणत्या प्रकारे हालचाली झालेल्या नाहीत, असे पुढे रवीश कुमार म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोकलामचा वाद चर्चेत होता. 16 जूनपासून पुढे 7 दिवस सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान भारत-चीनचे सैनिक आमने-सामने होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. 

जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, या वादानंतर आता एका मिलिट्री इंटेलिजेंस ऑफिसरनं (निवृत्त) 6 सप्टेंबरची सॅटेलाइट छायाचित्राचा हवाला देत डोकलाम सीमेवर आताही चीनकडून संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा दावा केला आहे.

Web Title: There is no new dispute over China's border with the border, foreign ministry has clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.