धर्माच्या नावे महिलांवर अत्याचार नको
By admin | Published: October 25, 2016 04:49 AM2016-10-25T04:49:08+5:302016-10-25T04:49:08+5:30
मुस्लिमांमध्ये असलेल्या तीन वेळा तलाक पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोष दिला व या विषयाचे राजकारण करणाऱ्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.
महोबा (उत्तर प्रदेश) : मुस्लिमांमध्ये असलेल्या तीन वेळा तलाक पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोष दिला व या विषयाचे राजकारण करणाऱ्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.
वादग्रस्त बनलेल्या तलाक विषयावर मोदी यांनी प्रथमच जाहीरपणे भाष्य केले. मोदी म्हणाले, ‘‘तलाकचा विषय आता समोर आला आहे. एखाद्या हिंदुने स्त्री भ्रूणहत्या केली तर त्याला जसे तुरुंगात जावे लागते त्याच प्रमाणे एखादा फोनवर ‘तलाक’ असे म्हणतो व माझ्या मुस्लीम भगिनींचे आयुष्य उद्धवस्त होते’’ मोदी उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील महापरिवर्तन मेळाव्यात बोलत होते.
तलाकच्या विषयाला हिंदूविरुद्ध मुस्लीम किंवा भाजपविरुद्ध इतर पक्ष अशा वळणावर नेऊ नका, असे आवाहन मोदी यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांना केले. तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रात महिलांवर धर्माच्या आधारे कोणतेही अत्याचार किंवा भेदभाव होता कामा नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे. लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे. सरकारने आपली भूमिका समोर मांडली आहे. ज्यांना तीन वेळा तलाकवरून विषयांतर करायचे आहे ते लोकांना चिथावणी देत आहेत. देशात तीनवेळा तलाकमुळे महिलांचे जीवन नाश पाऊ पावण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)