लष्कराला 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही - फरहान अख्तर

By admin | Published: October 29, 2016 02:51 PM2016-10-29T14:51:52+5:302016-10-29T15:00:46+5:30

'रईस' सिनेमाचा सहनिर्माता फरहान अख्तरने भारतीय लष्कराला पाच कोटी रुपये देण्यास नाकारले आहेत.

There is no question of giving Rs 5 crore to the army - Farhan Akhtar | लष्कराला 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही - फरहान अख्तर

लष्कराला 5 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही - फरहान अख्तर

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 29 - 'ए दिल है मुश्किल'वरुन तापलेले वातावरण शांत झालेले असताना आता 'रईस'वरुन नव्याने वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. 'रईस' सिनेमाचा सहनिर्माता फरहान अख्तरने लष्कराला पाच कोटी रुपये देण्यास नाकारले आहे. 'लष्कराने स्वतः पाच कोटी रुपये घेण्यासाठी नाकारल्याने त्यांना ती रक्कम देण्याचा प्रश्नच येत नाही', असे विधान फरहानने केले आहे. त्यामुळे यावरुन पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसंदर्भातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. 
 
'रईस' सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आहे, त्यामुळे फरहानच्या या वक्तव्यावरुन शमलेला वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे लष्कराच्या भूमिकेचे फरहानने कौतुक केले आहे, मात्र दुसरीकडे लष्कराला पाच कोटी रुपये न देण्यावर स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले आहे की, 'आम्ही कर भरतो त्यामुळे सुरक्षा पुरवण्याची सरकारची जबाबदारी आहे'. यावर, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ज्यावेळी जवळ येईल तेव्हा याकडे लक्ष देऊ, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. 
 
आणखी बातम्या
'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे मनसेने तीव्र विरोध करत सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिनेनिर्माता असोसिएशनमध्ये बैठक झाली.  या बैठकीत पाकिस्तानी कलाकारांसोबत भविष्यात काम करणार नाही, तसंच ज्या आगामी सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत, त्यांच्या निर्मात्यांनी आर्मी फंडसाठी  5 कोटी रुपये द्यावेत, या मनसेच्या अटी सिनेनिर्माता असोसिएशनने मान्य केल्यानंतर 'ए दिल...' मुश्किल टळली होती. 

Web Title: There is no question of giving Rs 5 crore to the army - Farhan Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.