निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही - जेटली

By admin | Published: November 18, 2016 07:16 AM2016-11-18T07:16:33+5:302016-11-18T07:16:33+5:30

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने पूर्ण नियोजन करूनच घेतला होता.

There is no question of withdrawing the decision - Jaitley | निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही - जेटली

निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही - जेटली

Next

नवी दिल्ली :  पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने पूर्ण नियोजन करूनच घेतला होता. गेल्या आठ दिवसांत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केल्याने लोकांच्या रांगा आणि तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले. 

...झाले असेही काही बदल
 राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गांवरील टोलमाफी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याची घोषणा, केंद्र व राज्य सरकारने केली. या निर्णयामुळे टोलनाके चालकांच्या नुकसानीची प्रतिपूर्ती सरकार करेल.
 पाणीपट्टी व विद्युत देयकांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रुपये मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील.
फोनबिलांसाठी २४ नोव्हेंबरपर्यंत हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे बीएसएनएलने ग्राहकांना कळविले आहे.
 एलआयसीने प्रीमियमचा ग्रेस पिरियड३० नोव्हेंबरपर्यंत वाढविला आहे.
2.5 लाखांपर्यंतची रक्कम घरात
विवाह असलेल्या कुटुंबाना बँकेतून काढण्याची मुभा दिली आहे.
क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांना
१0 हजार रुपये रोख मिळणार
1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनामध्ये आणण्याची सध्या कोणतीही योजना नसल्याची माहिती जेटली यांनी दिली.
2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून काढता याव्यात यासाठी आज दिवसभरात २२,५00 यंत्रे अद्ययावत करण्यात आली.
2.20लाखांच्या आसपास एटीएम देशात आहेत. शुक्रवारपासून रोज १२ हजार ५00 यंत्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत.

Web Title: There is no question of withdrawing the decision - Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.