सेक्स वर्करला पैसे न देणा-या ग्राहकावर बलात्काराचा गुन्हा नाही
By admin | Published: October 12, 2016 06:50 PM2016-10-12T18:50:13+5:302016-10-12T19:51:36+5:30
बंगळुरुतल्या एका 20 वर्षीय जुन्या बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं तीन आरोपींना दोषमुक्त केले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12- बंगळुरुतल्या एका 20 वर्षीय जुन्या बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं तीन आरोपींना दोषमुक्त केले. सेक्स वर्करला पैसे देण्यास नकार देणा-या ग्राहकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष आणि न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
कोणत्याही महिलेकडून दाखल झालेल्या बलात्काराच्या तक्रारीला काही प्रमाणात पुरावे उपलब्ध झाले पाहिजेत. मात्र त्यांच्या जबाबाला पूर्ण सत्यही मानता येणार नाही. यासाठी काही प्रमाणात पुरावे उपलब्ध असावेत, असे न्यायमूर्ती म्हणाले आहेत. बंगळुरूतल्या 20 वर्षांपूर्वीच्या एका घरगुती काम करणा-या महिलेनं तीन जणांवर बलात्काराचा आरोप लावला होता. तिला एका रिक्षातून पळवून नेऊन एक गॅरेजमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर कर्नाटक सरकारनं त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
मात्र त्या तीन आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाला आव्हान दिलं होतं. पीडित महिलेच्या मित्रानं मोठा गौप्यस्फोट करत महत्त्वपूर्ण जबाब देत पीडित महिला घरगुती काम करणा-या महिलेच्या आड सेक्स वर्करचं काम करते. त्यावेळी तिने आरोपींकडून सेक्सच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली होती. मात्र ते पैसे देण्यास आरोपींनी नकार दिल्यानं तिने पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला, असं त्यानं सांगितलं होतं.