‘हिंदुत्वा’च्या आधी केलेल्या व्याख्येचा फेरविचार नाही - सुप्रीम कोर्ट

By admin | Published: October 26, 2016 01:16 AM2016-10-26T01:16:53+5:302016-10-26T01:16:53+5:30

हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माशी संबंधित नसून तो हिंदू समाजाच्या जीवनशैलीशी संबंधीत आहे, या २० वर्षांपूर्वी केलेल्या व्याख्येचा कोणताही फेरविचार केला जाणार नाही,

There is no reconsideration of the definitions before 'Hinduism' - Supreme Court | ‘हिंदुत्वा’च्या आधी केलेल्या व्याख्येचा फेरविचार नाही - सुप्रीम कोर्ट

‘हिंदुत्वा’च्या आधी केलेल्या व्याख्येचा फेरविचार नाही - सुप्रीम कोर्ट

Next

नवी दिल्ली : ‘हिंदुत्व’ हा शब्द हिंदू धर्माशी संबंधित नसून तो हिंदू समाजाच्या जीवनशैलीशी संबंधीत आहे, या २० वर्षांपूर्वी केलेल्या व्याख्येचा कोणताही फेरविचार केला जाणार नाही, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केला.
सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. शरद बोबडे, न्या. अनिल कुमार गोयल, न्या. उदय लळित, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एल. नागेश्वर राव या सात न्यायाधीशांच्या विशेष पीठापुढे कामकाज सुरु होताच काही पक्षकारांनी सुनावणीत सहभागी होण्यास अर्ज केले तेव्हा न्यायालयाने हे स्पष्टिकरण केले.
सरन्यायाधीश न्या. ठाकूर म्हणाले की, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सूचना करताना जो ‘रेफरन्स’ केलेल्या चौकटीत सध्याची सुनावणी होईल. ‘रेफरन्स’च्या त्या निकालपत्रात ‘हिंदुत्वा’चा कुठेही उल्लेख नाही. तसा उल्लेख दाखवून दिले तर आम्ही त्याचा त्यावेळी विचार करू. तूर्तास तरी ‘हिंदुत्व’ म्हणजे काय याचा विचार करणार नाही वा १९९५ मधील ज्या निकालात ही व्याख्या केली गेली त्याचा फेरविचार करणार नाही.
न्यायालयाने स्पष्ट केले की, या सुनावणीत खास करून लोकप्रतिधित्व कायद्याच्या कलम १२३(३) अन्वये निषिद्ध ठरविलेल्या भ्रष्ट प्रचार मार्गावर विचार करणार आहोत. यानुसार धर्माच्या नावे मते मागणे हा निवडणूक गुन्हा ठरविण्यात आला असून तो सिद्ध झाल्यास उमेदवाराची निवडणूक रद्द करण्याची तरतूद आहे. याच अनुषंगाने धार्मिक नेत्यांचा लोकांवरील प्रभाव लक्षात घेऊन उमेदवाराने प्रचारात त्यांना उतरविणे हेही कलम १२३(३)च्या कक्षेत येते का, याचा आम्ही विचार करू.
भाजपाचे मुंबईतील तत्कालीन आमदार डॉ. रमेश प्रभू यांची निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाने ‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावर रद्द केली होती. त्यावर प्रभू यांनी केलेल्या अपिलाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ‘हिंदुत्वा’ची वरीलप्रमाणे व्याख्या केली होती.
११ डिसेंबर १९९५ रोजी न्यायालयाने ‘हिदुत्वा’वर दिलेल्या निकालाचा आमुलाग्र फेरविचार करावा, असा सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, रंगकर्मी व लेखक शमसूल इस्लाम व ज्येष्ठ पत्रकार दिलिप मंडल यांनी अर्ज केला होता. मात्र या अर्जासह इतरही असे अर्ज ऐकण्यास नकार दिला.

Web Title: There is no reconsideration of the definitions before 'Hinduism' - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.