शहरात सर्वत्र पाणीच पाणी दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन नाही : सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ रिपरिप, आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा
By Admin | Published: July 12, 2016 12:07 AM2016-07-12T00:07:24+5:302016-07-12T00:07:24+5:30
जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले.
ज गाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पावसामुळे शहरातील पवन नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. तसेच आज आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सकाळी कार्यालयामध्ये जाणार्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले. गेल्या आठवड्यात रविवारी व सोमवारी झालेल्या दमदार पावसानंतर गायब झालेला पाऊस रविवारी सकाळी झडी घेऊनच आला. १० जुलै रोजी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली आणि दिवस व रात्रभर तो सुरूच राहिला. सोमवारीदेखील दिवसभर या पावसाचा मुक्काम कायम होता. सोमवारी दुपारी केवळ बारा ते एक वाजे दरम्यान थोडा कमी झाला. मात्र रात्रीपर्यंत रिपरिप सुरूच होती. दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन नाही....रविवारी सुीवर गेलेले सूर्यनारायण दुसर्या दिवशीही उगवले नाही. त्यामुळे सलग दुसर्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. गारवा वाढवा....सततच्या पावसामुळे तापमानातही कमालीची घट होऊन दिवसादेखील गारवा जाणवत होता. या वातावरण बदलामुळे लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. सर्वत्र पाणीच पाणी....यंदा या पूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली असून त्यात आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भिजपावसामुळे जमिनीतही पाणी मुरत नसल्याने शहरातील सखल भागासह रस्त्याच्या कडेला, नाले, खड्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात सरस्वती डेअरीनजीकच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारीचे पाणी काही प्रमाणात रस्त्यावर आले होते. गोलाणी मार्केटजवळ शिरपूर बँकेनजीक मुख्य रस्त्यावर, स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या भिंतीनजीक, जिल्हा क्रीडा संकुल परिसरात पाणी साचले होते. पिंप्राळा रेल्वे गेटनजीक दोन्ही बाजूला पाणी तुंबलेले होते. फाटक बंद असताना वाहनधारकांना या पाण्यातच उभे रहावे लागत होते. केसी पार्कनजीक रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. या रस्त्यावरून केसी पार्क, त्रिभुवन कॉलनी भागातील नागरिकांसह कानळदा, आव्हाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ ये-जा करतात. शिवाजीनगर पूल पार केल्यानंतर भिकमचंद जैन शाळेसमोर मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.