विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

By Admin | Published: March 21, 2016 03:42 AM2016-03-21T03:42:18+5:302016-03-21T03:42:18+5:30

राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला.

There is no vote of independence for destruction | विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

googlenewsNext

नवी दिल्ली : राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला. राष्ट्रवाद व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र नांदू शकतात, तर ‘भारत माता की जय’ म्हणणे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही, अशी घोषणा देण्यात कुणालाही अडथळा वाटायला नको, असेही मत पक्षाने मांडले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे की, निवडणुकीत काही करण्याची आपली महत्त्वाकांक्षा पक्ष हरवून बसला आहे.’
जेटलींनी दावा केला की, ‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींत पक्षाची ताकद वाढेल. आसाममध्ये आमचे सरकार येईल, तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची दिशा बदलेल. राज्यसभेत अल्पमतात असलेला भाजपा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून या परिस्थितीला बदलू पाहत आहे. कारण, वरच्या सभागृहात जीएसटीसह काही महत्त्वाची विधेयके अडकली आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील सरकारवर आलेल्या संकटाबाबत बोलताना ते म्हणाले की, याचा दोष भाजपावर देऊ नका. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे.
या बैठकीतील प्रस्तावात असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक प्रगतिशील सरकार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, अतिरेक्यांना संपवून जवानांनी यावर लक्ष केंद्रित केले की, कशा प्रकारे कमीतकमी नुकसान होईल. भारत-बांगलादेश भूमी करार आणि माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन कराराचा उल्लेखही यात सरकारच्या कौशल्याचा भाग म्हणून केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘विकास, विकास आणि विकास’ हेच आपल्या सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे. विरोधी पक्ष निरर्थक विषय पुढे आणून यावरून लक्ष हटवू पाहात आहेत.
परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बळी न पडता, भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ सरकारच्या विकासाच्या अ‍ॅजेंड्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन सरकारने केलेली भरीव कामगिरी लोकांपुढे मांडावी, असेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्हीही पूर्ण समर्थन करतो. घटनेने विरोधी मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, विनाशाचा नव्हे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या, पण यासाठी अल्पसंख्याकांवर आरोप लावणे चुकीचे ठरेल. याचे नेतृत्व डाव्या विचारांच्या लोकांनी केले होते. - अरुण जेटली

Web Title: There is no vote of independence for destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.