जळगावात पाणीटंचाई नाही

By admin | Published: April 12, 2016 12:37 AM2016-04-12T00:37:56+5:302016-04-12T00:37:56+5:30

सुशील देवकर

There is no water shortage in Jalgaon | जळगावात पाणीटंचाई नाही

जळगावात पाणीटंचाई नाही

Next
शील देवकर

जळगाव- शहरासाठी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या द्रष्टेपणामुळे वाघूर धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. वाघूर धरणात आजच्या तारखेला शहराला आणखी किमान वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीटंचाईची स्थिती नाही. मात्र शहरात पूर्वीपासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती असली तरीही शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघूर धरणात आणखी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असल्याने टंचाईची भीती नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. नासाडी करू नये.
-नितीन ल‹ा, महापौर

Web Title: There is no water shortage in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.