बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच

By admin | Published: June 22, 2016 02:56 AM2016-06-22T02:56:54+5:302016-06-22T02:56:54+5:30

संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना बिहार सरकारतर्फे मात्र एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता.

There is no yoga day government program in Bihar | बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच

बिहारमध्ये योग दिनाचा सरकारी कार्यक्रम नाहीच

Next

एस. पी. सिन्हा, पाटणा
संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना बिहार सरकारतर्फे मात्र एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. पाटण्याच्या गांधी मैदानात पतंजली योगपीठातर्फे योग दिन साजरा करण्यात आला. त्यात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यापासून भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र बिहार सरकारचा प्रतिनिधी त्यात नव्हता.
केवळ योग दिन साजरा करून चालणार नाही. तो साजरा करण्याआधी देशभर दारूबंदी लागू करणे करजेचे आहे, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गेले काही दिवस सातत्याने करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी तशी विनंती केली होती. सुदृढ राहायचे असेल, तर आधी दारू बंद करणे गरजेचे असून, त्यानंतरच योगाचा उपयोग आहे, असे त्यांचे म्हणणे असून, त्यांनी ते अनेक ठिकाणी बोलूनही दाखवले आहे. मात्र त्यांच्या दारूबंदीच्या विनंतीचा केंद्र सरकारने विचारही न केल्यामुळे त्यांनी सरकारतर्फे बिहारतर्फे योग दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
केंद्र सरकार योगाचे निष्कारण राजकारण करीत आहे, त्या निमित्ताने सरकार स्वत:चाच प्रचार करीत असून, मोदी यांची प्रतिमा उंचावण्याचा हा प्रयत्न अयोग्य आहे, अशी टीका संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते संजयसिंह यांनी केली. योग दिन आयोजित न केल्याबद्दल आणि पाटण्यातील कार्यक्रमात सरकारतर्फे कोणीही हजर न राहिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने नितीशकुमार यंच्यावर कडाडून टीका केली. नितीशकुमार संकुचित राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपाने केला. गांधी मैदानात भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांचाच सहभाग अधिक होता. (वृत्तसंस्था)

बिहारने २१ जून हा विश्व संगीत दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त पाटण्यात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फ्रान्समध्ये २१ जूनला विश्व संगीत दिन आयोजित केला जातो.

Web Title: There is no yoga day government program in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.