दोन हजारच्या नोटेत नवं काही नाही
By admin | Published: January 10, 2017 12:16 PM2017-01-10T12:16:58+5:302017-01-10T13:33:24+5:30
दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याचा प्रस्ताव 19 मे 2016 मध्ये आरबीआय केंद्रीय मंडळाने मंजूर केला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याचा प्रस्ताव 19 मे 2016 मध्ये आरबीय केंद्रीय मंडळाने मंजूर केला होता. मात्र, दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांना मंजुरी देताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता. अशी माहिती आरबीआयने दिली आहे. केंद्राच्या आर्थिक स्थायी समितीला दिलेल्या पत्रात आरबीयने याचा उल्लेख केला आहे. मे नंतर झालेल्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील बैठकीतही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीवर कोणतीच चर्चा झाली नव्हती असेही त्यात उल्लेख केलेला आहे.
इंडियन एक्सप्रेसद्वारा टाकलेल्या माहिती अधिकारातील प्रश्नाला उत्तर देताना हा खुलासा झाला आहे. ज्यावेळी दोन हजार रुपयाच्या नव्या नोटेला मान्याता मिळाली तेव्हा आरबीआयचे रघुराम राजन गव्हर्नर होते.
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर बँक आणि एटीएम बाहेर नोटा जमा आणि बदलीसाठी रांगाच रांगा लागल्या होत्या.