रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी

By admin | Published: September 8, 2014 10:17 AM2014-09-08T10:17:51+5:302014-09-08T10:17:51+5:30

दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही असे विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केले आहे.

There is nothing wrong with drinking liquor at night - Chief Minister Manjhi | रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी

रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी

Next

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. ८ -  दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही असे विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केले आहे. दारु पिणे चुकीचे असले तरी ती औषधासारखी घेणे उचीत ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले जितनराम मांझी हे कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे समर्थन करणा-या मांझी यांनी आता थेट दारुचे समर्थन केल्याने वाद निर्माण झाला आहे. दलितांसाठी आयोजित एक कार्यक्रमात मुख्यमंत्री मांझी म्हणाले, दारु पिऊन गोंधळ घालणा-या दलितांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी त्यांनी दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यायला पाहिजे.  दलित दारू सोडू शकत नसतील तर त्यांनी ती औषधाप्रमाणे घ्यावी असा अजब सल्लाही त्यांनी दिला. 
अथक तपश्चर्येनंतर देवाने माझ्यावर कृपादृष्टी दाखवली आणि नितीशकुमार यांचे डोके फिरल्याने माझी मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली असे मांझी यांनी सांगितले. भाजपने मांझींच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. आधी भ्रष्टाचार आता दारु, राज्याचे मुख्यमंत्री अशा गोष्टींचे समर्थन करत असतील तर ती दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली आहे. 
 

Web Title: There is nothing wrong with drinking liquor at night - Chief Minister Manjhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.