काश्मीरमध्ये तापमानात पुन्हा मोठी घसरण
By admin | Published: February 10, 2017 01:13 AM2017-02-10T01:13:06+5:302017-02-10T01:13:06+5:30
शहरासह अनेक भागात पुन्हा बर्फवृष्टी होत असून परिसराला हुडहुडी भरली आहे. येथील तापमान उणे १.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले आहे
श्रीनगर : शहरासह अनेक भागात पुन्हा बर्फवृष्टी होत असून परिसराला हुडहुडी भरली आहे. येथील तापमान उणे १.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. काश्मीरात रात्रीच्या तापमानातही मोठी घट झाली आहे. लेह भागात तापमान ११.९ डिग्री सेल्सिअस एवढ्या नीचांकावर आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीर खोरे आणि लडाखच्या भागात पारा घसरला आहे. पहलगाम आणि अन्य काही भागात बर्फवृष्टी होत आहे. गत २४ तासात पहलगाममध्ये एक सेंमी बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रेकरुंसाठी आधार समजल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमध्ये तापमान उणे ५.४ एवढे घसरले आहे. याच भागात एक दिवसांपूर्वी तापमान वजा ०.२ डिग्री सेल्सिअस होते. श्रीनगरमध्ये बुधवारी तापमान ०.४ डिग्री सेल्सिअस होते तर गुरुवारी तापमान उणे १.२ डिग्री सेल्सिअस होते.