मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:39 AM2018-09-17T00:39:38+5:302018-09-17T00:40:04+5:30
मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला
लखनौ : गो-रक्षणाच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्या (मॉब लिंचिंग) या ‘लोकशाहीवरील कलंक’ आहेत, असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले.
मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गो-रक्षणाच्या नावाखाली मॉब लिंचिंगची प्रवृत्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारांचा हा कार्यक्रम (दलित, आदिवासी, मागास, मुस्लिम आणि ख्रिश्चन्सविरुद्ध) भाजपच्या प्रारंभापासून सुरू असून, घटनेविरुद्ध जाणे आणि घटनेशी सापत्नभावाची वागणूक याचा हा परिणाम आहे. लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी भाजपची वेगवेगळी रूपे समोर येत आहेत, असे सांगून मायावती म्हणाल्या, भाजप मोहक घोषणा करीत असून, वाजपेयी यांच्या हयातीत कधीही भाजपने त्यांच्या विचारांचे अनुसरण केले नाही, असा आरोप त्यांनी केला.